कलमठच्या अनिता गुरुनाथ कोरगावकर ठरल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कणकवली तालुक्यातील पहिल्या लाभार्थी

उद्या पासून होणार वाडीवार शिबिर – संदीप मेस्त्री

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कलमठ गावात आज सकाळी अनिता कोरगावकर, निता राणे यांचे योजना अर्ज ग्रामपंचायत माध्यमातून भरण्यात आले, आज सकाळी सबमिट झाले. यासाठी ग्रामपंचायतच्या डेटा ऑपरेटर अंकिता राणे यांनी मेहनत घेतली. कणकवली तालुक्यातील अनिता कोरगावकर ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत.यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, मुख्यसेविका गीता पाटकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य पपू यादव, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री सर्व अंगणवाडी सेविका पूजा हुनरे, सुनीता पाटकर, दिव्या करंजेकर, राजश्री शिर्के, गौरी गवळी, शर्मिला चव्हाण, आरती गुरव,सोनाली मेस्त्री, निकिता कदम, रत्नवली लाड, शुभांगी सावंत उपस्थित होते.उद्या 5 जुलैपासून कलमठ गावात वाडी निहाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने नियोजन करण्यात आले असल्याचे सरपंच मेस्त्री यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!