वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय, सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी नाधवडे येथे ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन सरपंच श्रीरंग पावसकर यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमांतर्गत शेतक-यांना आध आधुनिक शेतीसंबंधी माहिती व शेतातील अड्चणी व त्यावरील उपाय, शेतकरी यशोगाथा, शेतीपुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, बागायती शेती, पशुपालन, फळबाग लागवड व सरकारी योजना याविषयी सविस्तार मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन कुलाळ, यश जाधव, योगेश शंदे, कार्तिक अनभूले, मुकेश बोडके, सुलेमान इनामदार, संकेत बोधगीरे, शुभम लाळगे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत, सहाय्यक प्रा. एन. आर. फुटणकर यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रम प्रसंगी सरपंच श्रीरंग पावसकर, ग्रामसेवक संभाजी वाघमोडे यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.