भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आजी व माजी सरपंचांचा सत्कार
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमित महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार जाहीर झाला. १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्रामस्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांबद्दलचा पुरस्कार परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्राप्त झाला.
१ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास धनंजय मुंडे कृषिमंत्री, प्रशांतकुमार गुलाबाराव पाटील, कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रतिष्ठानमार्फत विविध स्तरावर कृषी व ग्राम पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ति यांना सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा ग्रामस्तरांवरील बहुमान ग्रामपंचायत परुळेबाजार ला प्रदान करण्यात आला.
याबद्दल भाजपा च्या वतिने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रभारी सरपंच राजु दुधवडकर व माजी सरपंच प्रदिप प्रभु यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती घनश्याम उर्फ निलेश सामंत, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, बुथ प्रमुख गणपत माधव, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, सुधिर ठाकुर, ग्रा.पं.सदस्य सीमा सावंत, सुधिर पेडणेकर इत्यादी उपस्थित होते.