युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण योजनेला लागणारे फॉर्म घरोघरी वाटण्याचा उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलमठ येथून सुरू करण्यात आला. कणकवली ,देवगड ,वैभववाडी, मतदारसंघात हे फॉर्म शिवसैनिकांतर्फे आणि युवा सेनेच्या वतीने आम्ही घरोघरी एक फॉर्म देण्याचा प्रयत्न आमचा असेल. 3000 च्या संख्येने हे फॉर्म आम्ही छापलेले आहेत. हा फॉर्म घेण्यासाठी तहसीलदार मध्ये जावं लागत, तहसीलदार ऑफिस मधून घेतलेला फॉर्म घरी भरावा लागतो. आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म सबमिट करायची त्यांची जबाबदारी अंगणवाडी सेविकांची आहे. तरच या योजनेचा खरा लाभ सर्व सामान्य महिलांनी राहील.

लाडकी बहीण योजना मध्यप्रदेश मध्ये आधीच सुरू झाली होती. आता महाराष्ट्र राज्य सरकारला जाग आली. उशिरा का होईना जाग आली. येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे. त्यावेळी आम्ही मागणी करू या लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे 1500 आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे दुप्पट करा अशी मागणी आमच्या पक्षाच्या वतीने करणार असल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा हा या लाडक्या बहिणी योजनेच्या स्वरूपाने सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे गरजवंत महिलांना हा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे. अशी आमची योजना श्री.सुशांत नाईक यांनी सांगितले.येत्या सोमवार पासून कणकवली शहरात तहसीलदार कार्यालयासमोर महिला सहाय्यता शाखा सुरू करणार आहोत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. ऑनलाइन फॉर्म आणि ऑफलाइन फॉर्म याच ठिकाणी मिळणार आहेत. युवा सेना प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले. यावेळी तालुका प्रमुख उत्तम लोके, संदिप गांवकर ,वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री, अर्चना कोरगावकर, अनुप वारंग, सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, निसार शेख, विलास गुडेकर, नंदकिशोर कोरगावकर आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!