अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोल्हापूर District Resource Person पदी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी, तालुका– वैभववाडी, जिल्हा– सिंधुदुर्ग येथील शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील उत्तीर्ण विद्यार्थी सुमित शिवाजी खाडे या विद्यार्थ्याची दि. 02 जुलै 2024 रोजी केंद्र शासन(Central Government )सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कोल्हापूर District Resource Person पदी निवड झाली आहे. महाविद्यालयातून दरवर्षी ९०% ते ९२% विद्यार्थ्याना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करून देण्यामध्ये महाविद्यालय पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहे. सुमित खाडे याची निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक संदीप पाटील सर, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले सर तसेच प्राचार्य महेश कदम यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!