खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी अंगणवाडी बंद; स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील हसोळ टेंब कोंडवाडी अंगणवाडी या शाळेला आज शनिवारी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी सकाळी ८.३० वाजता भेट दिली असता शाळा बंद असल्याची आढळली. सबंधित अंगणवाडी सेविकेला फोन द्वारे संपर्क साधला असता सदर सेविकेने शाळेला सुट्टी दिली असल्याचे समजते. याबाबत खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सबंधित अंगणवाडी सेविकेची वरीष्टाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

खारेपाटण हासोळटेंब कोंडवाडी येथे मिनी अंगणवाडी मंजूर असून आज शनिवारी शाळा बंद ठेवल्यामुळे मुलांच्या शालेय पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंगणवाडी सेविकेंच्या कामकाजावर लक्ष नसल्यामुळे खारेपाटण मध्ये जेव्हा वाटेल तेव्हा अंगणवाडी बंद ठेवणे, गृहभेटी न करणे, पोषण आहार देण्यात हेळसांड करणे, शाळा परिसर स्वच्छ न ठेवणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस आपसा आपसात सेटलमेंट करून वरिष्ठांना कल्पना न देता परस्पर रजेवर जाणे आदी घटना घडत आहेत. असल्याचे देखील रमाकांत राऊत यांनी सांगितले.

दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजने “अंतर्गत सद्या राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांना ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज भरण्याचे तसेच कुटुंब सर्व्हेचे काम दिले असून मिळालेल्या माहिती नुसार आज कणकवली येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागामार्फत शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचे प्रशिक्षण खारेपाटणसह कणकवलीत तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांना आज शनिवारी सकाळी १०.०० वाजता कणकवली येथे वरिष्ठ देणार असल्याने सबंधित प्रशिक्षणाला सर्व अंगणवाडी सेविका गेल्या असल्याचे समजते. मात्र ज्या मिनी अंगणवाडी आहेत तेथील सेविकाना शाळा बंद ठेवून प्रशिक्षणाला जावे लागले आहे. याबाबत मुलांचे शैशनिक नुकसान करून तसेच मुलांच्या पोषण आहार चुकवून अंगणवाडी सेविकांनी एखाद्या प्रशिक्षणाला जाणे उचित नसून त्यांनी वरिष्ठां मार्फत पर्यायी व्यवस्था करून जाने गरजेचे असल्याचे रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!