खारेपाटण तालुका झालाच पाहिजे.अशी एकमुखी मागणी सर्वानुमते करण्यात आली
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण व्हावा.या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या कणकवली देवगड व राजापूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच आणि ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार समारंभ खारेपाटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष व खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृहात आज संपन्न झाला.
या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य तथा खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार, पं.स. सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत, प्रशांत लाड, अशपाक हाजू, नूर काझी,महेश कोळसुलकर खारेपाटण ग्रा.प. सदस्य गुरूप्रसाद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तर खारेपाटण तालुका कृती समितीच्या वतीने सर्व उपस्थितीत मान्यवरांचे समितीचे उपाध्यक्ष मंगेश गुरव यांच्या शुभहस्ते पुषपगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, कुणकवण सरपंच वैषाली विजय पांचाळ, उपसरपंच मंगेश विश्राम गुरव, वाघीवरे – वेळगिवे सरपंच राजन मोहन लाड,शेर्पे सरपंच स्मिता विलास पांचाळ,उपसरपंच सिराज गफार मुजावर,गुंजवणे सरपंच नीलम लवू पतीयान,माजी सरपंच धोंडू रावजी घेवडे,साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, फणसगाव सरपंच सौ.सायली सुभाष कोकाटे, चिंचवली सरपंच अशोक भिकाजी पाटील,पोंभुर्ले ग्रा.प.सदस्य लक्ष्मण पडवळ, वारगाव माजी सरपंच एकनाथ राजाराम कोकाटे, कोंडये सरपंच कु.मीनल शांताराम तळवडेकर,कोर्ले उपसरपंच सुनील शंकर कांबळे, शिडवणे ग्रा.प.सदस्य दयानंद कुडतरकर, कुरंगवणे सरपंच संतोष प्रकाश ब्रम्हदंडे,उपसरपंच निवृत्ती पवार,बुरबावडे सरपंच अनुष्का जिवेंद्र शिंगे, पाटगाव सरपंच नितेश सहदेव गुरव,नडगिवे सरपंच माधवी प्रेमकुमार मण्यार, वायंगणी उपसरपंच प्रताप फाटक आदी कणकवली,देवगड व राजापूर या तालुक्यातील सरपंच,उपसरपंच तसेच ग्रा.प.सदस्य यांचा सत्कार खारेपाटण तालुका कृती समितीच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.तसेच सर्व सरपंचांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी कोडये,ता.राजापूर जि.रत्नागिरी या गावच्या सरपंच श्रीम.मीनल तळवडेकर,उंडील, ता.देवगड जि.सिंधुदुर्ग या गावचे उपसरपंच जयेश नर,साळीस्ते ता.कणकवली या गावचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर आदी सरपंच महोदयांनी आपली मनोगते व्यक्त करून खारेपाटण तालुका होण्यासाठी जाहीर पाठींबा व्यक्त केला.तसेच खारेपाटण तालुका व्हावा ही गेल्या ४० वर्षापासूनची मागणी असून खारेपाटण तालुका झाल्यास कणकवली राजापूर व देवगड गावातील बऱ्याच गावांचा फायदा होणार असून खारेपाटण तालुका निर्मितीच्या या चळवळीला सर्व गावानी मिळून पुढे नेऊया असे भावपूर्ण उदगार खारेपाटण गावचे माजी सरपंच व खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना काढले. यावेळी रवींद्र जठार,प्रवीण लोकरे,रवींद्र मांजरेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण तालुका कृती समितीचे सचिव संतोष पाटणकर यांनी केले.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष मंगेश गुरव यांनी केले.व खारेपाटण तालुका का गरजेचे आहे.? व आजपर्यंतचे कृती समितीचे कार्य याचा आढावा घेतला.तर आभार समितीचे सदस्य योगेश गोडवे यांनी मानले.या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामस्थ व दशक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















