नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन.
चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण तिर्थरुप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक ०१ मार्च २०२३ रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता अलिबाग जि रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मानित पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ सचीनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यामधे देवगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी , शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि तहसीलदार कार्यालय वैभववाडी, कणकवली बस स्थानक, शासकीय ग्रामीण रुग्णालय मालवण, तहसीलदार कार्यालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील दाभोली नाका ते निमुसगा रस्ता अशा विविध ठिकाणी साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या श्रीसमर्थ बैठकीतून २०१० सदस्य सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानामध्ये ओला व सुका कचरा मिळून देवगड येथे अंदाजे ८ टन, वैभववाडी येथे अंदाजे ८ टन, कणकवली येथे अंदाजे १० टन, मालवण येथे अंदाजे ३ टन, कुडाळ येथे अंदाजे ६.५ टन, सावंतवाडी येथे अंदाजे ५० टन तसेच वेंगुर्ले येथे अंदाजे २५ टन असा मिळून एकूण सुमारे ११०.५ टन कचरा गोळा करण्यात आला.