कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संभाव्य लाभार्थी महिलांच्या मदतीसाठी वागदे ग्रामपंचायत मध्ये सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक युवराज बोराडे, लक्ष्मण घाडीगांवकर, उमेश घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
वागदे ग्रा पं मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुविधाकक्ष सुरू












