तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे पोलीस दुरक्षेत्र इमारतीला 7 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून दरवर्षीप्रमाणे पोलीस दुरक्षेत्र इमारतीत पुराचे पाणी शिरले. कासार्डे तिठ्यावर असलेल्या पोलीस दुरक्षेत्र इमारतीला दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो. नॅशनल हायवे च्या चौपदरीकरण कामामुळे सगळ्या पाण्याचा निचरा नीट होत नाही. पोलीस दुरक्षेत्र इमारतीच्या सभोवताली हे पाणी साचून राहते. याचा फटका पोलीस दुरक्षेत्रामध्ये कार्यरत पोलीस अंमलदारांना बसतो. वरिष्ठांनी याची दखल घेत नवीन पोलीस दुरक्षेत्र इमारत सुरक्षित स्थळी बांधावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
कासार्डे पोलीस दुरक्षेत्र इमारतीत पुराचे पाणी












