बॅ नाथ पै सेवांगण च्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!

मसूरे (प्रतिनिधी) : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून मालवण तालुक्यात इ ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात ११ विद्यार्थी व ग्रामिण विभागात ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.यामध्ये बॅ नाथ पै सेवांगण च्या मालवण विभागातून ६ व कट्टा शाखेतून २ असे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.

शहरी विभाग- लेईशा पराडकर गुण २४६( तालुक्यात पहिली व जिल्हयात आठवी),सोहम गवाणकर २३४ गुण ( तालुक्यात दुसरा जिल्ह्यात १५ वा), स्वरीत कोल्हे गुण २१६ ( तालुक्यात ३रा व जिल्हयात २३ वा), स्वरा बांदेकर १९४ गुण( तालुक्यात ८ वी व जिल्ह्यात ५३ वी), मंतसा खान गुण १९४ ( तालुक्यात ९ वी जिल्ह्यात ५४वी),मीरा वराडकर गुण १८८( तालुक्यात ११वी व जिल्हयात ६० वी), ग्रामीण विभाग काव्या अभिमन्यू, मेस्त्री गुण २२४ तालुक्यात पहिली,मनस्वी शैलेश परब गुण १९६

तालुक्यात दुसरी.सेवांगण मालवण शिष्यवृत्ती वर्गाचे हे दुसरे वर्ष असून २ वर्षात १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. सेवांगण कट्टा शाखेचे हे २४ वे वर्ष असून या २४ वर्षात १५६ विद्यार्थी गुणवत्ता धारक ठरले आहेत. जुलै महिन्यात शुभारंभ होवून हा वर्ग जानेवारी पर्यंत दर शनिवारी व रविवारी सुरू असतो. विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शना बरोबरीने सराव परीक्षा घेतल्या जातात. मालवण येथे मनाली वेंगुर्लेकर व कट्टा येथे मनोज काळसेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून व इतरही काही शिक्षक मार्गदर्शन करतात.या सर्व गुणवंतांचे सेवांगणचे अध्यक्षॲड देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह शैलेश खांडाळेकर,
कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, अध्यक्ष शाम पावसकर, कार्यवाह वैष्णवी लाड, ज्योती तोरसकर, दीपक भोगटे सर्व कार्यकारिणो सदस्य , सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!