कुडाळ (प्रतिनिधी) : कोंकणच्या दशावतार लोककलेला व्यासपीठ मिळवून देण्याचे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळचे काम कौतुकास्पद आहे .हा ग्रूप गेली बारा वर्षे एक तप हा मॉन्सून महोत्सव साजरा करत आहे . येथील कलावताना शासन दरबारी मानधन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे भविष्यातही या दशावतार कलावंताच्या कलेचा गौरव होण्यासाठी शासन पातळीवर जे जे प्रयत्न करता येतील ते मी करणार आहे असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मॉन्सून महोत्सव अंतर्गत आयोजित संयुक्त दशावतार नाट्य महोत्सवात शनिवारी रात्री केले
कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित मान्सून महोत्सवाचे उद्घाटन येथील सिध्दिविनायक हाॅल (रेल्वेस्टेशन रोड) येथे शनिवारी करण्यात आले होते . उदघाटनानंतर महारथी कर्ण हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर झाला.महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष आहे.कुडाळ येथे हा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी राजेश म्हाडेश्वर, सचिव स्वरूप सावंत, सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट,संजय करलकर (मुंबई), दिपक भोगटे, सुहास चव्हाण (मुंबई), संजय गावस (गोवा), पोलिस कर्मचारी संजय मांजरेकर (ओरोस),बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा प्रकाश पारकर, दशावतारी कलाकार सिद्धेश कलिंगण, दिनेश गोरे, अमोल राणे (कणकवली), प्रिन्स स्पोर्ट्सचे सुनील धुरी, आदींसह सदस्य तसेच सिंधुदुर्गासह मुंबई व गोवा येथील मोठ्या संख्येने नाट्य रसिक प्रेक्षक उपस्थित होते. उद्धाटनानंतर या महोत्सवाला आम वैभव नाईक राज्य शासनाच्या सेन्सॉर बोर्डचे सदस्य तथा कुडाळचे माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट दिली
उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष राजू पाटणकर व सहका-यांनी केले. निवेदन राजा सामंत यांनी केले. उदघाटनानंतर संयुक्त दशावतारी ‘महारथी कर्ण’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. जिल्ह्यातील आघाडीच्या कलाकारांनी यात सहभाग घेतला. रविवार ‘इंद्रभक्त इंद्रभानू’ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला यात प्रतिक कलिंगण (गणपती), संजय वालावलकर (इंद्र), भरत नाईक (इंद्रभानू), सिध्देश कलिंगण (कृष्ण),उदय मोर्ये (मेघवर्ण),सागर गावकर (वृषकेतु),प्रसाद तवटे (भीम), यश जळवी(रंभा), शिवा मेस्त्री ( द्रौपदी), चारूहास मांजरेकर (नारद), केशव खांबल (मारूती) या कलाकारांचा सहभाग होता . त्यांना अमोल मोचेमांडकर (हार्मोनिअम), अर्जुन सावंत (पखवाज) व हरेश नेमळेकर(तालरक्षक) संगीत साथ दिली .
दशावतार कलावंताचा परिपूर्ण असा माहिती ग्रंथ संकलन करणार- विजय चव्हाण
लाजरी ग्रूप कुडाळ हे संयुक्त दशावतार घेण्याचा बारा वर्षाचा एक तप पूर्ण करत आहे. मी तमाम जिल्हावासियांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी सेन्सॉर बोर्डावर सदस्य झालो आहे हे सदस्यपद म्हणजे साता समुद्रापार पोचलेली आपली दशावतार लोककला या लोककलेची माझी बांधिलकी आहे म्हणूनच भारत सरकारच्या संगीत सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत जिल्ह्यातील लोककलेबाबतची सर्वागीण परिपूर्ण माहिती घेताना तुम्हा सर्वाचे योगदान महत्त्वाचे आहे ही कला अधिक वृद्धिगत होण्यासाठी सर्वांनी एका छत्राखाली येणे आवश्यक आहे ज्यांनी योगदान दिले आणि आता देत आहेत अशा सर्वाची माहिती असणारा परिपूर्ण माहिती ग्रंथ भारत सरकारच्या संगीत सांस्कृतिक विभागामार्फत करण्याचा माझा मानस आहे याबाबत प्राथमिक बोलणी झाली असून लवकरच मान्यता मिळेल असे सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा रंगकर्मी विजय चव्हाण यांनी सांगत दशावतार साठी विविध योजना राबविण्यासाठी मी निश्चितच माझ्या पदाचा वापर करणार यासाठी सर्वप्रथम सर्व दशावतार कलावंतांनी एका छत्राखाली येणे आवश्यक आहे असे सांगितले.











