साळगाव हायस्कुल शिष्यवृत्ती प्राप्त निधी सावंत चा संस्थाध्यक्ष प्रदीप तेंडोलकर यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या कुमारी निधी एकनाथ सावंत या विद्यार्थीनीने इयत्ता ८ वी ग्रामीण सर्वसाधारण मधून शिष्यवृत्ती प्राप्त करत विद्यालयातून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली.तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभुतेंडोलकर यांनी तीचे व तिला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक सलीम तकीलदार सहा.शिक्षिका अर्चना चव्हाण,सहा.शिक्षक विद्यानंद पिळणकर, सहा.शिक्षक एकनाथ कांबळे, सहा.शिक्षिका वेदा परांजपे, सुप्रिया पेडणेकर यांचे तसेच कुमारी निधी सावंतचे आई-बाबा यांचेही अभिनंदन केले यावेळी संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभुतेंडोलकर याच्या हस्ते व मुख्याध्यापक सलीम तकीलदार तसेच सर्व शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुमारी निधी एकनाथ सावंत हिला पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!