वैभववाडी तालुक्यात धुवांधार पावसाने 6 घरांसह गोठा भातशेतीचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. तर तिरवडे तर्फ खारेपाटण येते नवीन कालवा फुटल्या मुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. काल दिवसभर सुमारे १८५ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी मात्र दिवसभर पावसाचा जोर पूर्णपणे ओसराला होता.आता पर्यंत १४१३ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाने रामचंद्र रघुनाथ इंदप (वाभवे) सुमित्रा धोंडू पवार( पालांडेवाडी) स्वाती विलास इंदुलकर (तिरवडे)अमिना इब्राहिम पाटणकर (महबूबनगर )विमल आत्माराम कुडाळकर (तिथवली )श्यामली विजय देसाई( टेबवाडी )यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. तर सत्यवती नामदेव पेडणेकर नाधवडे यांच्या गोठ्याचे अंशतः नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे तिरवडे तर्फ खारेपाटण येते नवीन सुरु असलेला कालवा फुटल्यामुळे परिसरातील सुमारे ४५ गुंठयातील भात शेतीचे नुकसान झाले आहे. याचा पंचनामा करण्यात आला आहे. तहसिलदार सूर्यकांत पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

error: Content is protected !!