कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित

पेडणे येथे बोगद्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी आले..

गाेवा (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावर  पेडणे येथे बोगद्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पुन्हा थांबवण्यात आली आहे. पाणी बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरू होईल. याच कारणामुळे या मार्गावर धावणाऱ्या गाड्या काल दिनांक ९•७•२०२४ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता रोखण्यात आल्या होत्या._ ही वाहतूक रात्री साडेदहा वाजता सुरू झाली. परंतु १०•७•२०२४ च्या मध्यरात्री तीन वाजता या ठिकाणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ही वाहतूक पुन्हा एकदा रोखण्यात आली. या ठिकाणचे पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १०० पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत.  कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा , मुख्य अभियंता नागदत्त , विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम आदी अधिकारी या ठिकाणी जातीनिशी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी सुरू असलेल्या कामावर लक्ष ठेवून आहेत. 

या अडचणीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील १३ गाड्या रद्द करण्यात आल्या तर ११ गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. २ गाड्या अंशता रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबई ते सावंतवाडी दरम्यान  धावणाऱ्या गाड्या नेहमीप्रमाणे सुरू आहेत.कोकण रेल्वेने अधिक माहितीसाठी प्रवाशांनी 0832 – 2706480 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आज संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!