त्या महिलेच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाला सत्ताधारी जबाबदार

कारवाई करण्याची शिवसेना उबाठा ची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तील स्टॉल धारक महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला नगरपंचायत मधील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना उबाठा चे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्याकडे लेखी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख शिवाजी राणे, नगरसेवक मनोज सावंत, उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे, उपविभाग प्रमुख यशवंत गवाणकर, उपस्थित होते.लोके यांनी निवेदनात म्हटले आहे की, वैभववाडी शहरातील स्टॉल सत्ताधाऱ्यांनी हटवले. मात्र त्यांना पर्यायी जागा दिली नाही. कित्येक महिने आपल्याला पर्यायी जागा दिली जाईल आणि स्टॉल लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू या आशेवर उध्वस्त स्टॉलधारक आहेत. त्यामुळेच त्या महिलेने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा कायदेशीर गुन्हा असून सत्ताधाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!