अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेंतर्गत २१ धनगर बांधवांचे घराचे स्वप्न पूर्ण

शासनाकडून निधी मंजूर : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती सिंधुदुर्ग यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ल्यातील २१ धनगर समाजातील लाभार्थ्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहेत. या घरकुलांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बेघर असलेल्या २१ लाभार्थ्यांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. या योजनेंतर्गत, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली गठित जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ल्यातील २१ वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रस्ताव पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांनी शासनास सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून यासाठी आवश्यक प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २५ लाख २० हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे.

योजनेच्या सन २०२४-२५ या सालासाठी प्रशासकीय मात्यता व निधी उपलब्ध झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ठ्यातील लाभार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. १ रवींद्र बाबुराव बांबर्डेकर (कुडाळ-वेताळबांबई), २. राजाराम रामंचद्र एडगे (कुडाळ-गोठोस), २. सुभाष गंगाराम कोकरे (कणकवली साळिस्ते), ४. सुरेश लक्ष्मण जानकर (कुडाळ-गोठोस), ५ चंद्रकांत सोनू जंगते (दोडामार्ग झरेबांबर) ६. विठोबा नारायण वरक (मालवण-काळसे), ७. सुरेश तुकारार धनगर (कुडाळ- परबवाडा), ८. राजन जानू सोरे (दोडामार्ग-कुहासे) ९. सागर सोनू वरक (कुडाळ-नेरुर), १० विजय जानू जंगले (सावंतवाडी-सरमळे), 99. सिद्धेश रामचंद्र शिंदे (देवगड-दाभोळे), १२ जनार्दन बमू खरात (देवगड-शिरगाव), १३ मतों सखाराम खरात (दोहामार्ग वझरे), १४. कृष्णात भैरू झोरे (मालवण-वहाचेपाट) १५. नवतु पांडुरंग झोरे (वैभववाडी-आचिर्णे), १६. अनंत पांडुरंग ऐडगे (कुडाळ गोठोस,) १७ नामदेव जानू जानकर (कुडाळ-गोठोस), १८. लक्ष्मण भैरू पाटील (सावंतवाडी-अआंबेगाव), १९. रामदास विदू जंगले (सावंतवाडी-आंबेगाव), २०. नवलू भागू झोरे (सावंतवाडी-आंबेगाव) २१ प्रशांत रामा झोरे (कुडाळ- वेताळबांबर्डे).

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय समितीतर्फे पाठविण्यात आलेले हे ठराव मंजूर व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता यासाठी त्यांनी संबंधित मंत्र्यांचीही भेट घेतली होती. त्यांच्याच प्रयत्नामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या २१ लाभार्थांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यापुढेही या योजनेतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील गरजू बांधवाचे घराचे स्वप्न पूर्व करण्यासाठी सिंधुदुर्ग भाजपतर्फे प्रयत्न केले जातील. पालकमंत्री चव्हाण यांनी प्राधान्यक्रम देऊन धनगर समाजातील बांधवांचे घराचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दत भाजपतर्फे आम्ही त्यांचे आभार मानत आहोत, असे या याविषयी माहिती देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!