बलात्काराच्या गुन्ह्यात संदेश देवरुखकर चा अटकपूर्व जामीन फेटाळला ; अटकेची टांगती तलवार

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पीडित महिलेवर ठाणे येथील लॉजवर बलात्कार करून पीडितेच्या घराजवळ तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात देवगड तालुक्यातील संदेश यशवंत देवरुखकर ( वय 45, मूळ रा.पडेल देवरूखकरवाडी, सध्या रा. तुळशीनगर देवगड ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा प्रधान न्यायाधीश हनुमंत गायकवाड यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्या वतीने यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी संदेश देवरुखकर याने ठाणे रेल्वे स्टेशननजीक च्या लॉजमधील रूममध्ये खोटे बोलून घेऊन जात तिथे पीडितेवर बलात्कार केला. तसेच पीडितेचे नकळत फोटो काढून ज्याज्यावेळी बोलवेन तेव्हा यायचे अशी धमकी दिली. पीडित महिला आपल्या गावतील घराबाहेरील बाथरूम मध्ये आंघोळीला जात असताना मागून येत तिचा विनयभंग करून संबंध ठेव नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली. हा गुन्हा 31 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता आणि 17 जून 2024 रोजी सायंकाळी पावणेआठ च्या सुमारास घडल्याची फिर्याद देवगड पोलीस ठाण्यात पीडितेने 24 जून 2024 रोजी दिली होती. त्यानुसार आरोपी संदेश देवरुखकर विरोधात आयपीसी कलम 376, 354, 354 ( अ ) (2 ) , 506 नुसार 24 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात आरोपी ने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जाला सरकारी वकील रूपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेतली. सदर गुन्हा महिलेच्या बाबतीत गंभीर गुन्हा आहे, जामीन मिळाल्यास आरोपी तपासकामी पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात हजर राहणार नाही, गुन्ह्याचा अनुषंगाने आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे, आरोपीचा अन्य कोणी साथीदार आहे काय तसेच आरोपी चा मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे, जामीन मंजूर झाल्यास तो फिर्यादी व साक्षीदार याना धमकावू शकतो, गुन्ह्यातील पुरावे नष्ट करू शकतो हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा प्रधान न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपी संदेश देवरुखकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

error: Content is protected !!