दोडामार्ग पोलिसांकडून अवैध दारुसह 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

बाबा धबधबा, मांगेली धबधबा ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना देणार दणका – पीआय ओतारी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे येथील बाबा धबधब्यासमोरील रस्त्यावर गोवा बनावटीच्या अवैध दारुसह एकूण 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल दोडामार्ग पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फिलिप्स सोच यांनी शनिवार 20 जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास केली. दरम्यान वर्षा पर्यटन सुरू झाले असून बाबा धबधबा, मांगेली धबधबा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहकुटुंब पर्यटक येतात. अशा वेळी हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांकडून त्यांना नाहक त्रास सहन करवा लागतो. अशा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सांगितले आहे.बाबा धबधब्यासमोरील रस्त्यावर बलेनो कार क्र. GA 03 – V – 3906 या कारमध्ये 10 हजार 300 रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळून आली.याबाबत हवालदार सोच यांच्या फिर्यादीवरून आरोपी सर्वेश संतोष परब ( वय 28, रा.सासोली, दोडामार्ग ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!