पुराच्या पाण्याची जवाहर चौकाकडे कुच
राजापूर (प्रतिनिधी) : शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असुन या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाकडे कुच केली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत.
बुधवार पासून संततधार पडणाऱ्या पावसाचा शनिवारी सकाळी काहीसा कमी झाला होता. त्यामुळे पुर ओसरून जनजीवन पुर्ववत सुरू झाले होते. मात्र शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असुन या पुराच्या पाण्याने जवाहर चौकापर्यंत धडक दिली आहे. पुराचे पाणी कधीही शहर बाजारपेठेत भरण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकिनारी असलेले व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. तर पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही तर्कतेतच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पुराच्या पाण्यामुळे शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका रोड पाण्याखाली गेला आहे. तर राजापूर शिळ चिखलगाव गोठणे रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरिल वाहतुक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. शहरातील अर्जुना नदीपात्रात असलेले पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेले असून वरचीपेठ परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेला आहे. तर संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठाही काही ठिकाणी खंडीत झाला आहे. काही ठिकाणी विजवाहीन्यांवर झाडे पडल्याने पोल व विजवाहिन्या तुटून विजपुरवठा खंडीत झाला आहे.











