कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ- गुरववाडी येथील रहिवासी व कलमठ ग्रामपंचायतचे वरिष्ठ माजी लिपिक दीपक दिगंबर गुरव (वय 43) यांचे काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. गेले अनेक वर्ष कलमठ ग्रामपंचायतच्या लिपिक पदी त्यांनी काम केले होते. कलमठच्या माजी सरपंच देविका गुरव यांचे ते पती होत. त्यांच्या पक्षात आई, पत्नी देविका, दोन मुले दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
कलमठ ग्रामपंचायतचे माजी लिपिक दीपक गुरव यांचे निधन











