तळेरे (प्रतिनिधी) : ओझरम सेवा मंडळ, मुंबई कडून 20,000 रू किंमतीची उत्कृष्ट दर्जाची ४ टेबल जिल्हा परिषद शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली.यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व संजय राणे (सदस्य),ओझरम सरपंच समृद्धी राणे,उपसरपंच प्रशांत राणे, सुधाकर राणे उपस्थित होते.
तसेच अशोक राणे यांनी “सीमेन्स ऐक्य एज्यूकेशन आणि वेल्फेअर ट्रस्टच्या”माध्यमातून शाळेला प्रोजेक्टर व संगणक शिक्षणाबाबतची इ .१ ली ते १० वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थाकरीता उपयुक्त अशी पुस्तके देणगी स्वरूपात भेट दिली.
या देणगीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शाळा ओझरम नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझरम सेवा मंडळाचे आभार व्यक्त करण्याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मीही याच शाळेचा विद्यार्थी असून “चांगलं शिक्षण घ्या,शिक्षित व्हा”ओझरम सेवा मंडळ सदैव शैक्षणिक सहकार्यास तत्पर आहे नव्हे तर ते आमचं कर्तव्य आहे,असे महादेवराव राणे यांनी मुलांना व पालकांना सांगितले तसेच शिक्षकांच्या कामकाजाबाबत कौतुकही केले.
अशोकराव राणे यांनी “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा,चांगले संस्कार अंगी बाणवून कर्तृत्ववान बना “असे मुलांना मार्गदर्शन केले तसेच पुढील आठवडयात ओझरम सेवा मंडळाच्या मार्फत शाळा ओझरम नं .१ च्या इ .५ वी ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्याकरीता वसुंधरा विज्ञान केंद्र,नेरूर येथे विज्ञान सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी ओझरम सेवा मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व मुलांना मार्गदर्शन केले. तसेच कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवार यांनी ही मुलांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप राणे,शा.व्य.समिती अध्यक्ष दिपक राणे,एल.डी. राणे सदाशिव (बाबू ) राणे, बाळा राणे, भाई दळवी,विनोद राणे,गणेश राणे,तारामती सावंत (माई),उत्कर्षा घाटगे,अनुजा नाईक,शाळेच्या मुख्या.स्नेहल कदम,श्रीया गोसावी, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.विनायक जाधव यांनी केले तर आभार ज्योती ब्रम्हदंडे यांनी मानले.












