उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेत्ये येथील जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे दरम्यान यात नळ पाणी योजना तसेच इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये मार्ग सोनुर्ली रस्ता मजबुती करणे वेत्ये सट ते खाबलवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण असे विविध काम मंजूर करण्यात आले आहे. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ सरपंच गुणाजी गावडे, शिवसेना नेते बाळा गावडे उपतालुकाप्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे, उपसरपंच शितल खांबल, माजी सभापती रमेश गावकर, बाळू गावडे शरद जाधव संतोष गावडे, शेखर खांबल, सत्यवान गावडे तनवी गावकर आदी उपस्थित होते.