रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी,डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय देवगड च्या वतीने 8 मार्च राेजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर बुधवार दिनांक 8 मार्च 23 रोजी सकाळी 9 ते 1 यावेळेत आयोजित केले आहे. तरी गरजूनी यां शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड तर्फे करण्यात येत आहे. या शिबिराची वैषीट्ये आहेत,कॉम्पुटरद्वारे अचूक चष्मा नंबर व मोतीबिंदू निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात. सवालतीच्या दरात चष्मे वाटप केले जाईल. सदर शिबीर हे डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, सातपायरी, देवगड येथे घेण्यात येईल.अधिक माहितीसाठी रो. दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!