आमदार नितेश राणे यांनी केले पावसकर कुटुंबाचे सांत्वन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते विनय केशव पावसकर यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुंबांचे आमदार नितेश राणे यांनी तळेरे येथे भेट देऊन सांत्वन केले.

तळेरे पंचक्रोशीत पावसकर हे विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. त्यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम करताना वैयक्तिक आणि सामाजिक कार्य अत्यंत जबाबदारीने आणि मुक्तपणे केले. पावसकर यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या दुःखातून पावसकर कुटुंबाला सावरण्याची शक्ती देवो यासाठी आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती दिलीप तळेकर, पावसकर यांचे बंधू प्रभाकर पावसकर, सागर पावसकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!