पाेलिस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते महिलांचा सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत करूळ च्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. ३० वर्षापूर्वी आरोग्याची कोणतीही सुविधा नसताना गावात सुवीन म्हणून काम करणाऱ्या महिलांचा या दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. तसेच कौतुकास्पद काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थी व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेत ग्रामपंचायत परिसर व पोलीस चेक नाका परिसर स्वच्छ केला. काही वर्षांपूर्वी गावात सुवीन म्हणून काम केलेल्या सुमित्रा जनार्दन पाटील, जयवंती भाऊ पाटील, सुलक्षणा शिवाजी कदम यांचा साडी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षिका अनुराधा पाटील, वेलाकाणी गुरव, ताई व्हनाते, अर्चना पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे, सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, भास्कर सावंत, जितेंद्र पवार, विलास गुरव, रामचंद्र शिवगण, रेखा सरफरे, दीपा जामदार, रोहिणी लाड, माधवी राऊत, संध्या शिवगण आदी उपस्थित होत्या. यानिमित्त संगीत खुर्ची व रस्सीखेच स्पर्धा पार पडली. रस्सीखेच स्पर्धेमध्ये भट्टीवाडी महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर जामदारवाडी महिला संघाने द्वितीय क्रमांक पटकावता. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपिका पवार, द्वितीय क्रमांक निशा सावंत, तृतीय क्रमांक रोहिणी लाड यांनी पटकाविला. विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. पोलीस निरीक्षक अमित यादव, मुकुंद शिनगारे, सरपंच नरेंद्र कोलते, अनुराधा पाटील, अर्चना पाटील, वेतांकनी गुरव पानी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विलास गुरव, सूत्रसंचालन नवनाथ सगरे तर आभार ग्रामसेवक शशिकांत गुरव यांनी मानले. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.