तळेरे (प्रतिनिधी) : साळीस्ते ग्रा पं मध्ये जागतिक दिन आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव यांच्या हस्ते गावातील महिलांना आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या लोह, कॅल्शियमयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले.गावातील कर्तबगार महिलांचा सत्कारही ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला.यावेळी ग्रामसेवक विशाल वरवडेकर, ग्रा पं सदस्य मानसी बारस्कर, प्रेमलता गुरव, मंगेश कांबळे, तेजल कुडतरकर, गिरीश कांबळे, हर्षदा ताम्हणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.