आमदार नितेश राणे यांच्या आमदार आपल्या दारी कार्यक्रमाचा खारेपाटण येथून शुभारंभ

जनतेशी थेट संवाद साधत जाणून घेतल्या विविध समस्या

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या “आमदार आपल्या दारी ” कार्यक्रमाचा शुभारंभ आज कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी श्री देव काल भैरव मंदिर येथून करण्यात आला. “तुमचा अर्थात आपला लाडका आमदार तुमच्या दारी” या उपक्रमांतर्गत असणाऱ्या जनसंपर्क मोहिमेच्या निम्मिताने खारेपाटण येथे श्री कालभैरव मंदिर येथे आशीर्वाद घेत आम. नितेश राणे यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेचा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला.


यावेळी खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव,तालुकाध्यक्ष -संतोष कानडे, जि. प. सदस्य -बाळा जठार,माजी सभापती -मनोज रावराणे,माजी सभापती -दिलीप तळेकर,सुरेश सावंत,मिलिंद मेस्त्री,पं. स. सदस्या -तृप्ती मालवदे,माजी सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,सूर्यकांत भालेकर, व्यापारी असोशिशन चे अध्यक्ष -प्रांजल कुबल खारेपाटण कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष पे मधुकरशेठ गुरव,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,संचालक भाऊ राणे,विजय देसाई, खारेपाटण हायस्कूल मुख्याद्यापक संजय सानप, नंदकिशोर कोरगावकर,रवींद्र शेट्ये, यशवंत रायबागकर,शेखर शिंदे,ग्रा. पं सदस्य -क्षितिजा धुमाळे, मनाली होनाळे, दक्षता सुतार, आस्थाली पवार, अमिषा गुरव, जयदीप देसाई, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे,उज्वला चिके,-आस्था पाटणकर, बचतगट अध्यक्षा, खारेपाटण दूरक्षेत्र चे अंमलदार -उद्धव साबळे आदि सह अनेक महिला वर्ग व खारेपाटण येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी खारेपाटण मधील ग्रामस्थांशी नितेश राणे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद या जनसंपर्क मोहिमेसाठी पाहण्यास मिळाला. खारेपाटण व्यापारी संघटना,आरोग्य विभाग , विजवितरण, एसटी महामंडळ, रिक्षा संघटना, बचत गट महिला, शैक्षणिक विभाग अश्या सर्वच स्तरातील लोकं या जनसंपर्क मोहिमे साठी उपस्थित होती. प्रत्येक स्तरातील लोकांनी आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेल्या कामाबद्दल आभार मानले व आपल्याला हव्या असलेल्या काही सोयी सुविधाबाबत नितेश राणे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली.येणाऱ्या विधानसभा निवडणुकी च्या पार्शवभूमीवर देखील या जनसंपर्क मोहिमेत चर्चा करण्यात आली. मागच्या लोकसभा निवडनुकीत झालेल्या मतदान यांची चर्चा करून येणाऱ्या विधानसभा निवडूकीत सुद्धा आपल्या खारेपाटण वासियांनाचा निवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद व पाठींबा असेल असा विश्वास आम राणे यांनी व्यक्त केला.खारेपाटण येथील पुराची समस्या, बाजरापेठ येथील रस्त्याची समस्या, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बस ची समस्या, खारेपाटण येथील ट्रॅफिक ची समस्या, शुकनदी तील गाळ उपसा ची मागणी, तसेच खारेपाटण बस स्टॅन्ड येथील जुने सौचालय पाडून रिक्षा वाल्याना जागा मोकळी करून देण्याची मागणी, खारेपाटण येथील रिंग रोड, तसेच संरक्षक भिंत, अश्या अनेक मागण्या व समस्यावर लोकांनी चर्चा केली.. या सर्व मागण्या व समस्या जाणून घेऊन आम. नितेश राणे यांनी लोकांना सांगितले की या सर्व तुमच्या समस्या व मागण्या आहेत त्यावर उपाय काढून सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. असे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी खारेपाटण गावच्या वतीने सरपंच प्राची इसवलकर यांनी आमदार नितेश राणे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.तर संपूर्ण खारेपाटण गावच्या वतीने मधुकर शेठ गुरव यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केले.तर सर्वांचे आभार सूर्यकांत भालेकर यांनी मानले.

error: Content is protected !!