रँलीत पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : नुकताच कोकणात एकीकडे धुलीवंदनच्या दिवशी ग्रामीण भागात नागरिक मोठ्या आनंदाने रंगोत्सव साजरा करीत होते. तर याच धुलीवंदनच्या निमित्ताने सुट्टीच्या दिवसाचे औचित्य ध्यानात घेवून संविता आश्रतील निवासी युवतीं ,जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते आणि पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या सहभागातून पणादूर परिसरात जनजागृती रँलीचे आयोजन करण्यात आले होते. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांच्या संकल्पनेतून कुटुंबांतील जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर या जनजागृती रँलीचे आयोजन करण्यात आले होते.
जेष्ठ नागरिक कुटुंब आणि समाजातील महत्वाचे घटक असून आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांची काळजी घेतलीपाहिजे. हा संदेश युवकांच्या माध्यमातून संविता आश्रमच्या पंचक्रोशीतील गावांमधे युवकांच्या सहभागातील रँलीद्वारे पोहचविण्याचे कार्य करण्यात आले.
पणदूर तिठा ते अणाव रामेश्वर मंदिर मार्गे पालवाडी,वेशीवाडी मार्गे संविता आश्रम पणदूर असा या रँलीचा मार्ग होता.रँलीमधे संदिप परब यांचेसह जीवन आनंद संस्थेचे महाबळेश्वर कामत, प्रसाद आंगणे, नरेश आंगणे यांचा सहभाग होता.
रँलीच्या आयोजनात प्रा.दिपक गावडे सर यांचा सक्रीय सहभाग राहिला तर काँलेजचे प्राचार्य शिंदे सर यांचे विशेष सहकार्य राहिले.