सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील मोती तलावात एका युवकाने उडी घेतल्याची घटना तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या निदर्शनास आली. घटनास्थळी एक राखाडी रंगाची दुचाकी उभी आहे. त्यामुळे संबंधित युवक एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी शहरातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी येथील न्यायालय परिसरात गर्दी केली आहे. पोलीस तसेच नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे.












