कुसुर पिंपळवाडी येथील घटना
वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसुर पिंपळवाडी येथे विजापूर कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या व्हाळात पलटी झाली. या अपघातात सदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधून 32 प्रवाशी प्रवास करीत होते. यापैकी 10 प्रवाशांना किरकोळ दुःखापत झाली आहे. त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
विजापूर ते कुडाळ ही एस. टी. बस चालक दिणेश झाडे घेऊन जात होते. बस कुसूर पिपंळवाडी येथील पळसुळे नर्सरी जवळ आली असता वैभववाडीकडून उंबर्डेच्या दिशेने जाणारा मोटारसायकल स्वार एस टी समोर आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एस. टी. बस रस्त्याच्या साईड पट्टीवर उतरली. मात्र साईडपट्टी मजबूत नसल्यामुळे एसटी बस बस नजीक असलेल्या व्हाळात पलटी झाली. बस दरवाजाकडेच्या बाजूला पलटी झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेत एस टी बसच्या मागच्या बाजूच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये विलास पाटील, विकी पाटील, संतोष पाटील, मंगेश लोके,नासीर काझी यांनी जखमीना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीसांनी रुग्वाहीका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यातील किरकोळ जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येते दाखल केले आहे. तर अन्य प्रवाशांना खाजगी वाहनातून वैभववाडी पर्यंत आणण्यात आले.
बस पाण्यात पडल्यामुळे प्रवशानाच्या बॅग अनेकांचे मोबाईल बस मध्ये पडले आहेत वाहकाची तिकीट काढण्याची मशीन ही पडलेला आहे.