आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा व देवगड तालुक्यातील धालवली गावचे सुपुत्र भजनसम्राट प्रमोद हर्याण बुवा यांचा वाढदिवस महालक्ष्मी मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम स्मारक संचलित, आनंद निकेतन वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत केक कापून, अन्नदान करून व त्यांच्या सोबत एकत्रित भजन गायन सादर करून साजरा करण्यात आला. यावेळी हर्याण बुवा शिष्य परिवाराने वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रियांका हर्याण, बाबाजी कानडे, संतोष टक्के, प्रमोद परब, संतोष शितकर, दुर्वास गुरव, ऋत्विज चव्हाण, सतिश कार्लेकर, प्रदीप राऊळ, राकेश मिसाळ, सुंदर टक्के, आबा सावंत, सागर सावंत, ऊमेश सावंत, क्रिष्णा धुरी, अक्षय कदम, गुरुदास घाडी, नितीन गावकर, प्रतिक घोलेकर, रुपेश पाटकर, महेंद्र घाडीगावकर, सत्यवान राणे, उदय पांचाळ व पावणादेवी प्रा भजन मंडळाचे सर्व सभासद व अनेक भजनी कलाकार उपस्थित होते.
गेली पाच वर्षे हर्याण बुवा शिष्य परिवार माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी बोलताना हर्याण म्हणाले कि, आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो त्यामुळे वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून वृद्धांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे, त्यांची सेवा करून त्यांना आपल्या आनंदात सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं यात आम्हाला वेगळा आनंद भेटला. वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा आंनद पाहून मनाला कुठेतरी सार्थक व वृद्धांची सेवा करण्यास मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असे हर्याण बुवा याप्रसंगी म्हणाले.













