चिंदर गावची कन्या रेमिता फर्नांडिस हिचे सीए परीक्षेत यश
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावची कन्या रेमिता रुजाय फर्नांडिस हिने 2024 साली झालेल्या चार्टर्ड अकाउंट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सीए होण्याचा बहुमान मिळवीला आहे. याच बरोबर तिने चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुंबई महानगरपालिका मधून निवृत्त झालेले गुणवंत कामगार व सध्या मुंबई अंधेरी इथे वास्तव्य असलेले सामाजिक कार्यकर्ते रुजाय किस्तु फर्नांडिस यांची ती कन्या होय. रेमिता फर्नांडिस हिच्या या यशा बद्दल चिंदरवासीयान कडून व सर्वत्र कौतुक होत आहे.











