शिवपुतळा दुर्घटना .. मालवण मधील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होणार सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे – अमित सामंत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 28 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या राजकोट येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मालवण राजकोट येथे जयंत पाटील येणार आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी १०-३० वाजता मालवण राजकोट (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ) येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी केले आहे,

error: Content is protected !!