मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना बोलावण्यात आले. रमण पेडणेकर यांनी सदर अजगरास सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.यावेळी सर्पमित्र सतीश मसुरकर यांनी त्यांना सहकार्य केले. सरपटणारे प्राणी लोकवस्तीत आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रमण पेडणेकर यांनी केले आहे.