यशस्वी वर्षपूर्ती सेवेबद्दल स्थानिक समाजसेवकांकडून तलाठी संतोष सावंत यांचा गौरव !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वादातीत फोंडाघाटच्या प्रशासकीय सेवेत काम करताना, येथील जनतेने सदैव सहकार्याचा, सामंजस्याचा हात पुढे केला. त्यामुळे शासनाचे विविध उपक्रम आणि योजना राबविताना, लोकसभागातून अपेक्षित काम करण्याची सदैव ऊर्जा मिळाली. त्यामुळे येथील कामकाजाबद्दल मी समाधानी आहे. अशी ग्वाही फोंडाघाट तलाठी संतोष सावंत यांनी दिली.

फोंडाघाट तलाठी सज्जा च्या महसूल विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, तलाठी संतोष सावंत यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.शांत, संयमी आणि लोकांप्रती आस्था असल्याने तसेच तात्काळ काम करण्याची हातोटी, यामुळे त्यांनी अल्पावधीत लोकाभिमुख कामाचे प्रात्यक्षिक देताना, “सरकारी काम sss” ही म्हण खोटी ठरवली. त्यामुळे स्थानिक समाजसेवक अनिल सावंत- पटेल,राजेश शिरोडकर, राजेश पावसकर,राजा ठाकूर, राजेंद्र मोरये ,राजेंद्र मरीये यांनी त्यांच्या वर्षपूर्ती निमित्ताने कार्याची पोचपावती म्हणून शाल- श्रीफळ- पुष्पगुच्छ देऊन छोटेखानी गौरव केला. राजेश शिरोडकर यांच्या या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!