खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ला तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण विभागाच्य वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबविण्यात आलेल्या शैशणिक वर्ष सन २०२४ – २०२५ “मुख्यमंत्री माझी शाळा – स्वछ व सुंदर शाळा ” उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून शाळेच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून ज्या शाळेची निवड झालेली आहे. व जीची ओळख आदर्श शाळा म्हणून आहे.अशी खारेपाटण गावातील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत कणकवली तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून सदर शाळा आता पुढील होणाऱ्या जिल्हा स्तरीय निवड स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. शाळेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर व त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग यांनी खूप मेहनत व परिश्रम घेऊन हे यश प्राप्त केले असून खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष व समिती सदस्य तथा शिक्षण तज्ज्ञ संतोष पाटणकर उपाध्यक्ष सौ प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे,माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ संध्या पोरे स्थानिक प्राधिकरण समिती सदस्य व ग्रा.पं. गुरुप्रसाद शिंदे यांनी शाळेचे व शाळेच्या शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले आहे.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळेने यापूर्वी देखील सन २०२३ – २४ शैशणिक वर्षी देखील मुख्यमंत्री माझी शाळा – स्वछ सुंदर शाळा स्पर्धेत सहभाग घेतला होता.पूर्ण तयारी निशी सदर शाळा स्पर्धेत उतरली होती.मात्र दुर्देवाने राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हनून ओळख असणाऱ्या या शाळेला यश प्राप्त झाले नाही.परंतु मागे न हटता पुन्हा एकदा नव्या जोमाने यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्वछ सुंदर शाळा स्पर्धेत सहभाग घेऊन कणकवली तालुक्यात या शाळेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून शाळेच्या या यशामुळे खारेपाटण गावचे नाव उज्ज्वल झाले असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तसेच शिक्षणतज्ज्ञ श्री संतोष पाटणकर यांनी व्यक्त केली आहे.