मसुरेपोईप येथे वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात संपन्न!
मसुरे (प्रतिनिधी) : पोईप येथील वेलांकनी चॅपेल मध्ये वेलांकनी मातेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पोईप येथील ख्रिस्ती बांधवांनी नऊ दिवस नोवेना केली. यात सर्व समाजातील तसेच वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना केली गेली. या सणासाठी प्रमुख मसुरा पॅरीसच्या फादर गिलबट, चिंदर गावचे फादर सॅबी, माणगावचे फादर विल्यम वरळीकर आणि फादर फ्रँकलीन यांनी उपस्थित राहून येथील उपस्थित ख्रिस्ती बांधवांना धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. मसुरा चर्चच्या सिस्टर यांनी वेलांकणी मातेची मुर्ती घेऊन सर्व खिस्ती बाधवांच्या उपस्थितीत पोईप बाजार पेठ येथे शांतता फेरी काढली. तसेच या सणासाठी मसुरे, कसाल, चिंदर, वेरली, कट्टा या गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.निकोलस लोबो यांनी सुत्रसंचालन करून सर्वाचे आभार मानले.