मुटाट गावच्या पोलीस पाटील पदी अमित साळुंखे यांची नियुक्ती

खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुटाट ( बौद्धवाडी ) येथील रहीवाशी श्री अमित साळुंखे यांची नुकतीच महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने मुटाट गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून आभिनंदन करण्यात येत आहे.

अमित साळुंखे हे मुटाट ग्रामीण बौद्ध विकास मंडळाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत असून अष्टपैलू क्रिकेट समालोचक म्हणून देखील त्यांची देवगड तालुक्यात ओळख आहे.तसेच श्री साळुंखे हे सामाजिक व धार्मिक कार्यात देखील अग्रेसर असून मुटाट गावच्या पोलीस पाटील पदी त्यांची शासनाच्या वतीने निवड झाल्याबद्दल देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाच्या वतीने माजी अध्यक्ष किशोर कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!