वसंतराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नेगुरुजी वसाहत येथील लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे कार्याध्यक्ष, तसचं कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे आज बुधवारी दुपारी अल्पशा आजारानं दुःखद निधन. ते माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे वडील होते..
गेल्या अनेक वर्षात त्यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान राहिल. शिक्षण क्षेत्रात काम करत त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. ते साईकृपा नागरी पतसंस्थेचे संस्थापक देखील होते. वसंतराव देशमुख यांच्या प्रकृती कारणास्तव त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून निघणारय. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे.










