मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरीकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील व देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्यात येत आहे. त्यासाठी भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या योजनेमध्ये राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्र पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबीचा समावेश असेल. या योजनेकरिता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY) प्रधान्य कुटुंब योजना (PHH) वर्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले (NPH) शिधापत्रिकाधारक, लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा. अशा अटी व निकष शासननिर्णयात नमूद केलेले आहेत.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय.आर. सी. टी. सी. (IRCTC) समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रवाशांचो निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी (ज्यांचे वय 60 वर्षे पेक्षा कमी असेल) किंवा सहायक (ज्यांचे वय 21 ते 50 वर्षे असेल) यापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!