अन्यथा गाड्या रोखो आंदोलन करणार ; सामाजिक कार्यकर्ते सुनील सदानंद नारकर यांचा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटरस्त्याचे काम रखडल्या मुळे वैभववाडी-उंबर्डे- खारेपाटण – गगनबावडा रस्तावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, हया वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे.ह्या अवजड आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केलेले रस्ते खराब झाले आहेत. येत्या 15 दिवसांत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद न केल्यास गाड्या रोखो आंदोलन करण्याचा इशारा भुईबावडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील सदानंद नारकर यांनी दिला आहे.
कित्येक वर्षानी तालुक्यातील हे दोन महत्वाचे रस्ते चांगल्या प्रकारे सुस्थितीत अति होते. जनतेचे सुस्थित रस्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. मात्र वैभववाडी तालुक्यातील महत्वाचाअसणारा रखडलेला करूळ घाट रस्ता चर्चेचा विषय बनून आहे. ठेकेदार या रस्त्याच्या पूर्णतेबद्दल तारीख पे तारीख देत आहे. ह्या विरुद्ध व्यापारी, प्रवासी, लोकप्रतिनिधी , पक्षीय पदाधिकारी यांनी अनेक आंदोलने केली. मात्र करूळ घाट रस्ता कधी मार्गी लागणार हे अनिश्चित आहे.
मात्र ट्या कारणामुळे नवीन तयार झालेले रस्ते, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणान्या अवजड वाहतुकी मुळे खराब होत आहेत., अपघाताचे प्रमाण तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, प्रसारमाध्यमे यांनी आवाज उठवूनही याच्यावर फरक पडत नाही. तालुक्यातील महसुल विभाण, पोलीस, आर.टि.ओ, मुग गिळून गप्प का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून याची दखल घेवून अवजड वाहतूक बंद न झाल्यास तिव्र आंदोलन करून गाड्या रोखणार असल्याचे समाजसेवक श्री. सुनिल सदानंद नारकर यांनी इशारा दिला आहे.