कणकवली गणपती साना येथे बाप्पाला साश्यनांनी रोप

जानवली नदीवरील पूल आकर्षक रोषणाई ने बनला आकर्षण बिंदू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मुख्य गणपती साना येथे अनंत चतुर्दशी दिवशी साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जानवली नदिपुलावर बांधलेला पूल भाविकांचे आकर्षण बिंदू ठरला होता. 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनी या पुलाचे भूमिपूजन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. नाबार्ड च्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलासाठी मंजूर केला होता. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी जून महिन्यापूर्वी हा पूल पूर्ण करण्याची ग्वाही उदघाटन प्रसंगी दिली होती. त्यानुसार अवघ्या सव्वा दोन महिन्यांच्या विक्रमी कालावधीत ठेकेदार अनिस नाईक यांनी हा पूल बांधून केला. वाहने व पादचाऱ्यांची पावसाळ्यात अडचण होऊ यासाठी पुलाच्या दुतर्फा अनिस नाईक यांनी तात्पुरता रस्ताही तयार करून दिला होता. याचा फायदा अनंत चतुर्दशी सह, पाचव्या दिवशी आणि गौरीगणपती विसर्जन दिवशी झाला. आकर्षक रोषणाई केलेल्या या पुलावरून गणेशभक्तांनी गणेशविसर्जनाचा आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!