तळेरे (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य नोंदणी व त्याविषयीची माहिती कणकवली शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या सभासदांना कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी दिली तसेच जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक व्यावसायिकांनी ताबडतोब उद्यापर्यंत अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले आहे. बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त रिक्षा चालकांचे व मालकांचे अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी जमा करावेत असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी कळविले आहे असे म्हटले आहे. उप प्रादेशिक कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी फक्त सदस्य नोंदणी अर्ज जमा करावेत. अर्जाची फी मागाहून भरणा करावी. असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी कळविले आहे.