नितेश याच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधी
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील बिडियेवाडी येथील नवीन गणपती विसर्जन स्थळाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले. अनेक वर्षांपासून कलमठ गावातील बीडियेवाडी ,बाजारपेठ, गोसावीवाडी, नाडकर्णी नगर,कोष्टीवाडी ग्रामस्थांची सुसज्ज गणपती साना साठी मागणी होती. कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत हे काम मंजूर होण्यासाठी आमदार राणे यांच्या कडे मागणी केली होती. त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या सुसज्ज गणपती साना होण्यासाठी निधी दिला असून ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
उद्घाटन प्रसंगी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सरपंच संदिप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, सुनील नाडकर्णी, महेश लाड, विजय चिंदरकर,पपू यादव, तेजस लोकरे,श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, परेश कांबळी, आबा कोरगावकर, गणेश पुजारे, बाबू नारकर, स्वरूप कोरगावकर, शेखर पेंडूरकर, समर्थ कोरगावकर, ऋत्विज राणे, प्रदीप कांबळी,कृष्णा कांबळी, प्रवीण परब, वैभव चिंदरकर उपस्थित होते.