आमदार नितेश राणेंनी घेतलेला बोगस प्रवेश शिवसेनेने केला उघड

सांगावे गांवकरवाडीच्या ग्रामस्थांची घरवापसी

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगवे-गांवकर वाडी येथे जात आमदार नितेश राणेंनी बोगस प्रवेश केला उघड. गांवकर वाडीतील ग्रामस्थांना वाडीची बैठक आहे असं सांगून एकत्र बोलवण्यात आले होते व खोटा प्रवेश करून घेतला. संदेश पारकर व सुशांत नाईक यांनी हा बोगस केला उघड.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले,शिवसेनचा गड अबेद्द आहे बाळासाहेबांचे विचार कोकणवासियांच्या मना-मनामध्ये रुजलेले आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणेंनी खोटे प्रवेश दाखवण्याचा प्रयन्त केला तरीही शिवसैनिक शिवसेनेपासून दूर जाणार नाहीत. गावकार वाडीतील जीकाही कामे असतील ती शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, आमदार नितेश राणेंनी कणकवली मतदार संघामध्ये अशेच खोटे प्रवेश काही ठिकाणी दाखवत आहेत. प्रेवेश दाखवून सुद्धा कोकणी जनता तुमच्या बरोबर नाही आहे. कणकवलीच्या जनतेचा शिवसेने वरती पूर्ण विश्वास आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, आल्या नंतर विकासकामांची पूर्तता करून ग्रामस्थांची कामे पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यापुढे खोटे प्रवेश दाखवल्यास शिवसेनेच्या माध्यमातून याच पद्धतीने पोलखोल केली जाईल.

यावेळी काल जे खोटे प्रवेश करून घेतले त्यातील समीर गांवकर व सर्व ग्रामस्थांनी सांगितले की आम्हाला वाडीची बैठक आहे म्हणून बोलवन्यात आले व आमची दिशाभूल करून आमचा खोटा प्रवेश दाखवण्यात आला. आम्ही सदैव शिवसेने सोबत आहोत आणि कायम राहणार असा ठाम विश्वास यावेळी सांगवे-गांवकर वाडीच्या ग्रामस्थांनी दिला. यात समीर गांवकर, रवींद्र गांवकर, सुमित गावकर, विलास गांवकर, राजेंद्र गांवकर, मंगाजी गांवकर, मधुकर गांवकर, अजय घाडीगावकर, सुशील गांवकर, हृषीकेश वाळके, अनिकेत गांवकर यांची दिशाभूल करून प्रवेश घेण्यात आला आज त्यांनी आपण सदैव शिवसेने सोबतच आहोत व कायम राहणार असे बोलताना सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संदीप गांवकर, तुषार गांवकर, कुणाल सावंत, संकेत गांवकर, संकेत म्हापणकर, सुमित गांवकर, दीपक घाडीगांवकर, प्रसाद गांवकर, शैलेश गांवकर, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!