कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना नवरात्रोत्सव २०२४ आयोजित च्या नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी रामदास विखाळे, तर खजिनदार पदी विलास गुडेकर यांची निवड करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच समितीची बैठक घेण्यात आली.
यावर्षीही ठाकरे शिवसेनेतर्फे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ट्रिकसीनयुक्त दशावतार नाटके, डबलबारी भजन सामने, फुगडी, पैठणी, गोंधळ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिक राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपतालुकाप्रमुख राजू राणे, राजू राठोड, रामदास विखाळे, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगावकर, स्नेहा धुरी, सचिन आचरेकर, विलास गुडेकर, रोहित राणे, अजित काणेकर, कोकी पाटकर व शिवसैनिक उपस्थित होते.