कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली एसटी स्टॅण्डमागील जंगल परिसरात बुधवारी रात्री १० वा. च्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय अज्ञात तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर जिजाबाई अंकुश जाधव (६० रा. कणकवली बाजारपेठ) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. जिजाबाई जाधव या लाकडे गोळा करण्यासाठी बस स्थानकामागील जंगलमय भागात गेल्या होत्या. दरम्यान त्यांना हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर ग्रे कलरची हाफ पँट आढळून आली. त्या माध्यमातून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहे.