कणकवली कॉलेज, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे परीक्षा
कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा 22 जानेवारी रोजी कणकवली कॉलेज कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे. संस्थानचा प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी या परीक्षेस पात्र असून यानंतर किंवा परीक्षेच्या दिवशी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरणा पावती सोबत ठेवायची आहे.
ही परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) साठी सराव परीक्षेस प्रवेश घेतलेल्यांसाठी आहे. शासकीय परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा होणार असून पेपर 1- स. 11 ते 12.30 व पेपर 2 दुपारी 1.30 ते 3 या वेळेत होतील. विद्यार्थ्यांनी स. 10.30 वा. नियोजीत हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी बैठक क्रमांक यादी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमसाठी स्वतंत्र असून ती परीक्षेदिवशी स. 9 वा. परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात येईल. यादी पाहून विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक व खोली नंबर निश्चित करावा. परीक्षा शुल्क भरणा पावती हेच हॉल तिकीट असून अन्य कशाचीही आवश्यकता नाही. या संदर्भात काही अडचण असल्यास संबंधित केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावयाचा आहे. कणकवलीतील बैठक क्रमांक घ व सावंतवाडीचे ड ने सुरू असून त्यानंतर च मराठी व ए इंग्रजी त्यानंतर इयत्ता व त्यानंतर 33 अंकी बैठक क्रमांक असणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर, शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर यांच्याशी संपर्क साधावा. सावंतवाडी केंद्रासाठी रावजी परब व सिध्देश कुलकर्णी (कळसुलकर हायस्कूल) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.