सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील युवा रक्तदाता संघटना व देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या वतीने आरोग्य क्षेत्रात गोरगरीब रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य दुतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, १०८ चे डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून निःशुल्क आरोग्य सेवा देत गोरगरीब, गरजूंसाठी जीवनदायीनी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच महाराष्ट्र शासन व बी.व्ही.जी. ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यात १०८ रुग्णवाहिका निःशुल्क आरोग्य सेवा मागील ८ वर्षापासून अखंडित देत समाजसेवी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी १०८ रुग्णवाहिकेला दिलेल्या हाकेला गेली कित्येक वर्षे सहकार्य करून रुग्णांचे जीव वाचवले. कोकणवासीयांची लाईफलाईन म्हणून कार्यरत असणारे १०८ चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॅनेजर विनायक पाटील यांचा सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी म्हणाले, डॉ. श्रीपाद पाटील व विनायक पाटील यांनी केलल्या कामाचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. जीवाची पर्वा न करता कमी मनुष्यबळ, यंत्रणांचा अभाव असताना देखील ही मंडळी अहोरात्र मेहनत घेतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रूग्णांचे जी आहेत.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, राघवेंद्र चितारी, अर्चित पोकळे, संदीप निवळे, साईश निर्गुण, वसंत सावंत, दिग्विजय मुरगूड, सिद्धेश मांजरेकर, पांडुरंग वर्दम, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, गौतम माठेकर यांच्यासह युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते.